Manoj Jarange Patil Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange News: मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची ताकद..."

Manoj Jarange Patil News: सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करताच मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिली.

Satish Daud

Manoj Jarange Patil Latest News

मनोज जरांगे पाटील यांच्या ७ महिन्याच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. रात्रीतूनच याबाबतचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. मागण्या मान्य होताच नवी मुंबईत मराठा समाजाने जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मी राज्य सरकारचे आभार मानतो, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे. "आमची विजयी सभा अंतरवाली सराटी येथील सभेपेक्षाही प्रचंड मोठी असेल. या सभेत आमचा सर्व मराठा समाज एकत्र जमणार आहे".

"आम्हाला फक्त ठिकाण बघायचं आहे. आम्ही शनिवारी (२७ जानेवारी) वाशी येथील शिवाजी चौकात जल्लोष करणार आणि त्यानंतर विजयी सभेची तारीख जाहीर करणार आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते.

त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली होती. सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शुक्रवारी (२६ जानेवारी) मराठ्यांचं वादळ नवी मुंबईत येऊन धडकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

SCROLL FOR NEXT