Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचं ठरलं; कोण-कोणत्या मतदारसंघात देणार उमेदवार? आवाहन करताना भावुक

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ मतदारसंघ ठरवल्याची माहिती समोर आलीय. जरांगेंनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. नेमकी काय रणनीती आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये जरांगेंनी उमेदवार दिले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट..

Girish Nikam

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आवाज उठवणारे आणि राज्यभरात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरला आहे. "जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा" अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी आपली भूमिका मांडलीय, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा 4 नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. ठराविक जागांवर जरांगे यांनी उमेदवार उभे केले आहेत. यावेळी समाज बांधवांना आवाहन करताना जरांगे पाटील भावूक झाल्याच पाहायला मिळालं.

1. बीड - बीड विधानसभा लढवणार. गेवराई आणि आष्टीबाबतनंतर चर्चा करून निर्णय घेणार आहे. केज (राखीव) बाबत स्थानिक मराठा जे निर्णय घेतली तो निर्णय घेणार आहे. उर्वरित उमेदवार पाडणार आहेत.

2. जालना - परतूर विधानसभा लढवणार. इतर ठिकाणी पाडणार

3. संभाजीनगर - फुलंब्री विधानसभा लढवणार. कन्नडबाबतनंतर निर्णय घेणार

4. हिंगोली - हिंगोली विधानसभा लढवणार. कलमनुरी पाडणार.

5. परभणी - पाथरी विधानसभा लढवणार. गंगाखेड, जिंतूर पाडणार

6. नांदेड - हदगाव विधानसभा लढवणार

7. लातूर - निलंगा विधानसभा लढवणार की लातूर ग्रामीण यावर एकमत झाले नाही. औसा पाडायचा.

8. धाराशिव - १) धाराशिव - कळंब आणि २) भूम -परंडा हे दोन मतदारसंघ लढवणार. तुळजापूर निवडणूक लढवायची आहे पण निर्णय नाही.

9. पुणे - १) पर्वती २) दौंड हे दोन विधानसभा लढवणार.

10. जळगाव - पाचोरा मतदारसंघ

11. सोलापूर - करमाळा मतदारसंघ. पंढरपूर आणि माढा निर्णय नाही.

12. नाशिक - नांदगाव मतदारसंघ

13. अहिल्यानगर/नगर - १) पाथर्डी- शेवगाव (श्रीगोंदा पाडायचा)

14. धुळे - शहर लढणार

पाडण्याची भूमिका -

1. मुंबईतील २३ मतदारसंघात पाडणार

2. सातारा जिल्ह्यात एकही उमेदवार नसेल. पाडण्याची भूमिका बजावणार

3. बुलढाणा जिल्ह्यात उमेदवार नाही. सर्व पाडायची भूमिका

मनोज जरांगे निवडणूक लढवणारे मतदारसंघ

1. बीड - बीड विधानसभा

2. जालना - परतूर विधानसभा

3. संभाजीनगर - फुलंब्री विधानसभा

4. हिंगोली - हिंगोली विधानसभा

5. परभणी - पाथ्री विधानसभा

6. नांदेड - हदगाव विधानसभा

7. लातूर - निलंगा / लातूर ग्रामीण विधानसभा यापैकी एक ठरणार

8. धाराशिव - १) धाराशिव - कळंब आणि २) भूम -परंडा हे दोन मतदारसंघ.

9. पुणे - १) पर्वती आणि २) दौंड हे दोन विधानसभा.

10. जळगाव - पाचोरा मतदारसंघ

11. सोलापूर - करमाळा मतदारसंघ

12. अहिल्यानगर/नगर - पाथर्डी- शेवगाव विधानसभा

दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर निवडणुकीवरुन टीका केलीय. जरांगे बारामतीला मॅनेज झाल्याचा आरोप हाकेंनी केलाय. अंतरवाली सराटी येथे सर्व इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली. ज्या मतदारसंघात मराठा, मुस्लिम आणि दलितांचं समीकरण अनुकूल असेल, तिथेच उमेदवार दिला जाणार आहे.

तसेच, जिथे हे समीकरण साधणार नाही, त्या ठिकाणी स्थानिक लोकसभेतील भूमिकेचा आधार घेऊन निर्णय घेण्यात येईल.मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे महायुतीला फटका बसणार की मविआला याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT