Mankhurd Shivaji nagar Saam tv
मुंबई/पुणे

Mankhurd Shivaji nagar : मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात ठाकरे गटाची खेळी; मित्रपक्षाविरोधात उतरवला उमेदवार

mankhurd shivaji nagar assembly constituency : मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात ठाकरे गटाची मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाने मित्र पक्षाविरोधाच उमेदवार उभा केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लागलं आहे. मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची जोरदार चर्चा होत आहे. या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून नवाब मलिक रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाकडून अबू आझमी रिंगणात उतरले आहेत. त्यानंतर ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे रिंगणात उतरले आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या खेळीची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचं चित्र अद्याप स्पष्ट झालेले दिसत नाहीये. एकीकडे अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांनी एबी फॉर्म अर्ज भरलाय.

दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटाने उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे रिंगणात उतरले आहेत. ठाकरे गटाचे राजेंद्र वाघमारे यांनी ठाकरे गट आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत.

शिंदे गटाकडूनही उमेदवार

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरेश पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला. सुरेश पाटील हे आज शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेतून अर्ज भरणार आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीतही काही ठिकाणी अंतर्गत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातही सना मलिक यांच्या विरोधात शिंदे गटाकडून अविनाश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT