Mumbai Shocking Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Shocking : ६ वर्षांच्या पुतण्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, काकाला विरह सहन झाला नाही; ट्रेनखाली झोकून संपवलं जीवन

Mumbai Shocking News : खड्ड्यात पडून ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचा मृत्यू त्याच्या काकाला सहन झाला नाही. त्यानंतर या काकाने ट्रेनखाली झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, मुंबई

मुंबई : मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचा मृत्यू त्याच्या काकाला सहन झाला नाही. त्यानंतर या काकाने ट्रेनखाली झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खड्ड्यात पडल्याने ६ वर्षीय आयुष शेगोकारचा मृत्यू झाला. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुलाचा मृत्यू झाला. आयुषच्या मृत्यूनंतर शेगोकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आयुष हा त्याच्या काकाकडे राहत होता

पुतण्या आयुषच्या मृत्यूमुळे काका शैलेश शेगोकारला नैराश्यात गेला. आयुषच्या मृत्यूनंतर त्याचा काका शैलेश शेगोकरने लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. शैलेशने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली. आयुषच्या काकाने चेंबूर आणि गोवंडीच्या मध्यावर ट्रेनखाली आत्महत्या केली आहे.

आयुषसोबत नेमकं काय घडलं?

आयुष हा मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेर खेळत होता. त्यावेळी आयुष हा पाण्याने भरलेल्या ९ फूट खड्ड्यात पडला. या घटनेनंतर रेल्वे स्टेशनजवळील एका प्रवाशाच्या लक्षात आलं की, त्यानंतर प्रवाशाने आयुषला खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यानंतर काही जणांना प्रवासांना सावध केलं. या घटनेची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पुढे वाशी जीआरपीच्या जवानांनी आयुषला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान, आयुषचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT