Sassoon Hospital : अधीक्षकपदासाठी मीच पात्र, दोन डॉक्टरांचा पदावर दावा; ससून रुग्णालयात मोठा गोंधळ

Sassoon Hospital News : डॅाक्टर तावरे यांच्याकडील ससून रुग्णालयातील अधीक्षकपदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आला आहे. ⁠राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तावरेंवर ही कारवाई केली आहे.
Sassoon Hospital
Sassoon HospitalSaam TV

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदाचा वाद गंभीर वळणावर येऊन पोहचला आहे. ⁠डॅाक्टर अजय तावरे आणि डॅाक्टर यल्लापा जाधव दोघेही वैद्यकीय अधीक्षकपदावर दावा करत आहेत. आपल्या मतावर ते ठाम असून दोघेही कार्यालयात ठाणमांडून बसलेत.

Sassoon Hospital
Pune Corporation : उघड्यावर कचरा टाकणाऱ्या १६ हजार नागरिकांवर कारवाई; पुणे महापालिकेकडून दंड वसूल

नेमकं प्रकरण काय?

ससून रुग्णालयातील या दोन्ही डॉक्टरांनी आपण वैद्यकीय अधीक्षक असल्याचा दावा केला आहे. ⁠डॅाक्टर तावरे यांच्याकडील ससून रुग्णालयातील अधीक्षकपदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आला आहे. ⁠राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी तावरेंवर ही कारवाई केली आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदाचा भार डॅाक्टर यल्लापा जाधव यांच्यावर सोपवण्यात आला. आज तावरे यांच्या जागी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ⁠त्यानुसार जाधव आपल्यापदाचा कार्यभार घेण्यासाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात आले.

यावेळी तावरे तेथेच बसले होते. हे कार्यालय माझे असून, मी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आहे, असं म्हणत तावरे त्यांनी पदभार देण्यास नकार दिला. ⁠मात्र जाधव यांची देखील नियुक्ती झाल्याने त्यांनीही हा पदभार माझा असल्याचं म्हणत तेथेच ठाणमांडलं.

सध्या ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात दोघेही ठाणमांडून बसले आहेत. ⁠ससूनचे डीन डॅाक्टर विनायक काळे यांनी सांगितल्यानंतरच पदभार सोडण्याबाबत निर्णय होईल, अशी भूमिका तावरे यांनी घेतली आहे. ⁠तर जाधव शासनाचे आदेश घेऊन पदभार घेण्यासाठी कार्यालयात बसून आहेत. आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sassoon Hospital
Sasoon Hospital: 'ती' नर्सचा वेषात आली अन् 3 महिन्याच्या चिमुकलीला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com