Manchar Pune-Nashik Highway Accident Saam TV
मुंबई/पुणे

Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर जीपची ट्रकला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

Manchar Pune-Nashik Highway Accident : अपघातात ५ जण जखमी असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहेत.

रोहिदास गाडगे

Pune News :

पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचरजवळ भल्या पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुकं असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

अपघातात जीपमधील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghavan Recipe: नाश्त्यासाठी बनवा कोकणी स्टाईल खमंग घावणे आणि झणझणीत नारळाची चटणी; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नागपूर-केंद्रीय मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चचे आयोजन..

Saturday Horoscope : मोठी गुंतवणूक टाळा; 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील खर्चात मोठी कपात; सरकारचे किती पैसे वाचणार? समोर आले नवे आकडे

SCROLL FOR NEXT