Crime News SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : आईस्क्रीम दिली नाही म्हणून मुलींसमोरच व्यक्तीला चाकूने भोसकलं, अंधेरीतील घटनेने खळबळ

Man Stabs for Ice Cream in Andheri : वसीम अकरम अब्दुल करीम खान (29 वर्ष) असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. वसीमवर त्याच्या दोन मुलींसमोर हा हल्ला झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai Crime News :

आईस्क्रीमसाठी ओळखीच्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. आईस्क्रीम घेण्यास नकार दिल्याने हा हल्ल्या केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आवेश मकरानी (२१ वर्ष) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Mumbai News)

वसीम अकरम अब्दुल करीम खान (29 वर्ष) असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. वसीमवर त्याच्या दोन मुलींसमोर हा हल्ला झाला आहे. आवेशने वसीमच्या पोटात आणि छातीत वार केले आहेत. जखमी वसीमवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील चांद कावल चाळ येथे राहणारा वसीम शनिवारी आपल्या लहान मुलींना आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर घेऊन जात होता. त्यावेळी आवेश त्याच्याजवळ आला. आवेशने मलाही एक आईस्क्रीम घे अशी मागणी वसीमकडे केली. मात्र वसीमकडे जास्त पैसे नसल्याने त्याने आईस्क्रीम घेऊन देण्यास नकार दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नकार दिल्याने संतापलेल्या आवेशने वसीमच्या पोटात, छातीवर चाकूने सपासप वार केले आणि तेथून पळ काढला. वसीम ताबडतोब घरी परतला. त्यावेळी त्याच्या भावाने त्याला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल केले. रविवारी वसीमने आवेशविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

आम्ही आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा हिस्ट्रीशीटर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT