Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला आणि...(पहा व्हिडिओ)

अनेकवेळा नागरिक घाई करत असतात आणि यामुळे अनेकवेळा अपघात देखील घडत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन (Mumbai Local) मध्ये चढताना किंवा लोकलमधून खाली उतरताना तोल गेल्यामुळे अनेकांचा अपघात घडल्याचे समोर येत आहे. प्रवाशांना नेहमी घाई न करता ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचे किंवा ट्रेनमधून खाली उतरण्याचे आवाहन नेहमी रेल्वे प्रशासनाकडून सतत करण्यात येत असते. (Man Dies while boarding Mumbai Local train)

पहा व्हिडिओ-

मात्र, असे असताना देखील अनेकवेळा नागरिक घाई करत असतात आणि यामुळे अनेकवेळा अपघात (Accident) देखील घडत असतात. आता असाच एक प्रकार मुंबई (Mumbai ) मधील दादर रेल्वेस्थानकातून (Dadar Railway Station) समोर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये (train) चढत असताना एका इसमाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादामध्ये हा प्रकार घडला असावा. सुदैवाने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या तिकीट तपासणीसने या इसमाच्या मदतीला धाव घेत त्या व्यक्तीला बाजूला खेचले आहे.

हे देखील पहा-

तिकीट तपासणीच्या सतर्कतेने हा मोठा अपघात टळला आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचले आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. दादर रेल्वे स्थानकात वरिष्ठ तिकीट तपासणीस असलेले नागेंद्र मिश्रा हे नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. ते ज्या प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणीसचे काम करत होते. त्या प्लॅटफॉर्म शेजारी एक लोकल ट्रेन आली होती.

या लोकलमध्ये एक प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा तोल गेला आणि खाली कोसळला आहे. नागेंद्र मिश्रा यांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ त्या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली आहे. नागेंद्र मिश्रा यांनी त्या प्रवाशाला लोकल ट्रेनपासून दूर खेचले आणि त्याचे प्राण वाचवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT