Local Train Accident Death  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : धावत्या लोकलमधून तरुणाने अचानक मारली नाल्यात उडी; रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू,नेमकं काय घडलं?

Kalyan Latest News : धावत्या लोकलमधून तरुणाने नाल्यात उडी मारल्याची घटना घडली आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकुर्लीहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकलमधून एका तरुणाने उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान लोकलमधून एका तरुणाने नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तरुणाने अचानक नाल्यात मारली उडी

ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान लोकलमधून तरुण नाल्यात पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने तरुणाला बाहेर काढलं होतं. त्यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

तरुण लोकलमधून कल्याणच्या दिशेने प्रवास करत असलेला हा तरुण ठाकुर्ली-कल्याण दरम्यान असलेल्या नाल्याजवळ साडे आठ वाजण्याच्या सुमारास लोकलमधून उडी मारली. याप्रकरणी सह प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने आत्महत्या का केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हिंगोलीत रेल्वेखाली दोघांची आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भल्या पहाटे दोघांनी रेल्वेखाली उड्या घेत आपलं जीवन संपवलं. यामध्ये हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील वसई गावातील गंगाधर सातपुते या शेतकऱ्याचा समावेश आहे. तर दुसरा व्यक्ती बोडखी गावातील संदीप प्रकाश हनवते असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे या दोन्ही घटनांमुळेजिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT