Mumbai News, NSCI Dome, Live Music Event 
मुंबई/पुणे

Mumbai News : मोठी बातमी! लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान व्यक्तीचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News, NSCI Dome, Live Music Event : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime News : मुंबईतील वरळी परिसर असलेल्या प्रसिद्ध 'एनएससीआय' (NSCI) डोममध्ये आयोजित एका लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संगीत विश्वासह मुंबईत एकच खळबळबळ उडाली आहे. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रकार घडल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी तातडीने तपास चक्रांना गती दिली आहे. या घटनेमागे ड्रग्ज (अमली पदार्थ) सेवनाचा काही संबंध आहे का, यादृष्टीनेही पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून या घटनेच्या सर्वच बाजू पडताळून पाहिल्या जात आहेत.

कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनी तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालाची (Medical Report) पोलीस वाट पाहत आहेत. यासोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामही पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. अहवाल आल्यानंतरच या मृत्यूमागील नेमके सत्य समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत थरार! भरधाव कारनं 20 जणांना उडवलं, महिला वकिलाचा जागीच मृत्यू; कार चालकाला VIP ट्रीटमेंट?

Teachers Day Gift Ideas: तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या सुंदर भेटवस्तू, ती पण अगदी स्वस्तात मस्त

हायकोर्टाचा दणका अन् 15 वर्षांची प्रतीक्षा संपली! 75 वर्षीय आजीला मिळाली हक्काच्या घराची चावी

Underarms Care Tips: अंडरआर्म्सचा काळेपणा आणि दुर्गंधी दूर करायची? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ उपाय करा

Elections : विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय घडामोडींना वेग; भाजपसह ३ प्रमुख पक्षांनी आधीच डाव टाकला

SCROLL FOR NEXT