Pankaja Munde saam tv
मुंबई/पुणे

Pankaja Munde News: पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करा तरच भाजपची सत्ता येईल, कार्येकर्ते पु्न्हा आक्रमक

पंकजा मुंडे या जरी उघड बोलत नसतील तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र आपल्या भावना उघडपणे मांडताना दिसतात.

साम टिव्ही ब्युरो

>> विनोद जिरे

बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांच्या नाराजीची चर्चा नेहमीच होत असते. त्यांना पक्षात डावललं जात असल्याची भावना त्यांचे कार्यकर्ते नेमहीच बोलून दाखवतात. आज पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याआधी कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहे. पंकजा मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी मुंडे समर्थक परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन सावरगावकडे रवाना होत आहेत. यावेळी कार्यकर्त्यानी पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद द्या, अशी मागणी केली आहे. (Latest Marathi News)

पंकजा मुंडेंना पालकमंत्री करा तरच भाजपची (BJP) सत्ता येईल, असा इशारा मुंडे समर्थकांनी दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या जरी उघड बोलत नसतील तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र आपल्या भावना उघडपणे मांडताना दिसतात.

काही दिवसांपूर्वीचा पंकजा मुंडेंचं एक वक्तव्य चर्चेत होतं. मी पक्षाशी प्रामाणिक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मला पराभूत करू शकणार नाहीत, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देतील

पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपाला सोडचिठ्ठी देतील एवढं निश्चित असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. 'पंकजा ताईंचे राष्ट्रवादीत स्वागतच आहे असं म्हणत मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं आवाहन देखील केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT