Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case family  Saam Tv News
मुंबई/पुणे

Tanisha Bhise death case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

Tanisha Bhise death case update : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट आलीये. मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा दिलाय.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. घैसास यांनी राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपुर्द केला आहे. डॉ घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली होती. भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या विरोधात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आलं होतं. अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी एक चौकशी समिती देखील नेमली होती. या समितीचा अहवाल समोर आला होता. या अहवालात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही तनिषा भिसे यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर दीनानाथ रुग्णालयाला समज देण्यात आल्याचं चाकणकर यांनी म्हटलं होतं.

तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं होतं. मागील काही दिवसांपासून भिसे यांच्या मृत्यूप्रकरणाचे पडसाद उमटत होते. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची होणारी बदनामी आणि रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे सुश्रुत घेसास यांनी राजीनामा दिला आहे. घैसास यांनी त्यांचा राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपुर्द केला आहे. तनिषा भिसे प्रकरणात डॉ. घैसास यांनी उपचारासाठी डिपॉझिटची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यावर दिवंगत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्नील नहार म्हणाले की, ' आता एक आवाहल आला आहे. या प्रकरणी भाजप आमदार अमित गोरखे बोलतील. आम्ही अहवाल आल्यावर बोलू. राजीनामा दिलाय, पण कारवाई झाली पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT