truck accident in Kasara Ghat 
मुंबई/पुणे

Kasara Ghat Accident : कसारा घाटात ट्रकचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, वाहनांच्या लांबच लांब रांगा

truck accident in Kasara Ghat: सरत्या वर्षाचा निरोप देण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच कसारा घाटात अपघात झालाय. त्यामुळे अनेकांना वाहतूककोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

फयाज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

Kasara ghat accident News today : कसारा घाटात भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय, तर एकजण जखमी झालाय. जखमीला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. ट्रक पलटी झाल्यानंतर काही काळ कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली होती. थोड्यावेळानंतर वाहतूक सुरळीत झाली.

मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात हा अपघात झाला. नवीन कसारा घाटतून उतरत असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक पलटी झाला. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे नवीन कसारा घाटात ट्रक पलटी झाला. हा ट्रक काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तीला दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर महामार्ग पोलीस व रूट पेट्रोलिंग टीमच्या सहाय्याने बाहेर काढले. जखमी व्यक्तीला कसारा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात झाला. या अपघातानंतर कसारा घाटात थोडावेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहने होती, त्यात अपघात झाल्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT