Raj Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्यांनी धरली शिंदेसेनेची वाट

Maharashtra Politics : राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय. ऐन निवडणुकीत मनसेच्या बड्या नेत्यांनी धरली शिंदेसेनेची वाट धरली आहे.

Vishal Gangurde

राज ठाकरेंना बसला दुसरा मोठा धक्का

राज ठाकरेंची बड्या नेत्या साथ सोडली

मनसे नेत्यांची शिंदे गटात एन्ट्री

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंनी मुंबई पिंजून काढायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे देखील आज मनसे उमेदवारांच्या शाखा भेटीच्या दौऱ्यावर आहेत. शाखा भेटीच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. संतोष धुरी यांच्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसे नेते संतोष धुरी यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या संतोष धुरी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संतोष धुरी यांनी आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर संतोष धुरी यांच्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हेमंत कांबळे यांच्यासहित इतर नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजा चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे अॅड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

मनसे नेत्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT