Mumbai Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

Mumbai News: मुंबईमध्ये आगीचे सत्र सुरू आहे. फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. मालवणीमध्ये आगीमध्ये होरपळून एकाचा मृत्यू झाला.

Priya More

दिवाळीच्या उत्सवादरम्यान मुंबईमध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबईत सोमवारी आगीच्या ३ घटना घडल्या. मालवणीमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी घटना अंधेरीत घडली. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवालामध्ये इमारतीला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मुंबईतील मालवणी गेट क्रमांक ७ परिसरात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीमध्ये मृत व्यक्तीचा मृतदेह जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

दुसरी घटना, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात इमारतीला भीषण आग लागली. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला येथील सुंदरवन परिसरात पूर्णा इमारतीला आग लागली. इमारतीमध्ये आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे कारण समोर आले नाही.

तिसरी घटना, ओशिवरा परिसरात पुन्हा आगीची घटना घडली. मुंबईतील आगींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ओशिवरा येथील महेश्वरी भवनच्या टेरेसवर आग लागली. इमारतीच्या छतावर उभारण्यात आलेल्या स्कॅफोल्डिंगला आग लागली. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानीचे मंदिर आजपासून 15 नोव्हेंबरपर्यंत 22 तास खुले राहणार

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

Rain Alert: ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ सुरूच, ९ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

NCP Merger:राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार? दोन्ही गटांकडून आमदारांसोबत चर्चा सुरु

Tuesday Horoscope : ‘या’ ३ राशींची सर्वात भयानक स्टेज; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT