Mumbai Pune Expressway Truck Car Accident News Today Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

Satish Daud

सचिन कदम, साम टीव्ही

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघाताचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथामिक माहिती आहे.  (Latest Marathi News)

कारमधील इतर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर आडवा (Accident) झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांचं सत्र सुरू आहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक्सप्रेस वेवर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेरनवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन डिव्हायडर तोडून पुणे लेनवर आडवा झाला. त्याचवेळी पुणे लेनवरून जात असलेल्या स्विफ्ट कारला या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या भयानक अपघातात कारचालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील ४ महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT