वसई-विरार महापालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय
ठाकरे गटाचा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय
निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याची माहिती मिळत आहे
ठाकरे गटाकडून 115 उमेदवार स्वबळावर उभे राहणार आहेत
मनोज तांबे, साम टीव्ही
राज्यातील २९ महापालिका हद्दीत राजकीय पक्षांच्या युती आणि आघाड्यांसाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तर दुसऱ्या पालिकेतही ठाकरे गटाकडून युती-आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वसई-विरारमध्ये उलट घडल्याचे समोर आलं आहे. वसई-विरार महापालिकेत ठाकरे गट महापालिकेकडून बाहेर पडला आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून युतीबाबत चर्चा सुरू होत्या. यासाठी ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेटही घेतली होती.
निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलं आहे.
ठाकरे गटाकडून पालिकेच्या 29 प्रभागांमध्ये तब्बल 115 उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिलं आहे. दरम्यान, या पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात काँग्रेसचा मनसेला विरोध
पुण्यात काँग्रेसचा मनसेला विरोध पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून मनसेला विरोध होत आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेऊन पुढे जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेसोबत जाण्याच्या तयारीत आहे. मनसे आणि राज ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. पण विचार पटत नसल्याने काँग्रेसचा मनसेला विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.