ias transfer  Saam tv
मुंबई/पुणे

राज्याच्या प्रशासनात पुन्हा मोठा उलटफेर; बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, कुठे झाली नियुक्ती?

IAS transfer : राज्याच्या प्रशासनात पुन्हा मोठा उलटफेर झाला आहे. राज्यातील बड्या IAS अधिकाऱ्याची बदली झाली आहे.

Vishal Gangurde

IAS अधिकारी विजय सूर्यवंशी यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

श्रावण हर्डीकर हे प्रभारी आयुक्त म्हणून पाहत होते काम

राज्यात पुन्हा प्रशासकीय फेरबदल

राज्यात प्रशासनात बदली आणि नियुक्त्यांची मालिका सुरूच आहे. राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली. विजय सूर्यवंशी असे बड्या आयएएस अधिकाऱ्यांचे नाव आहे.

विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियु्क्ती झाली आहे. याआधी श्रावण हर्डीकर हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभारी आयुक्त होते. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेला विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ आयुक्त मिळाला आहे.

सामान्य प्रशासनाच्या विभागाने सूर्यवंशी यांना सूचित केले आहे की, 'आम्ही तुमची बदली केली आहे. तुमची नियुक्ती महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे या रिक्तपदावर केली आहे. ते पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून केली आहे. आता सध्याच्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव यांच्या सल्ल्याने अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्रावण हडिकर, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा'.

कोण आहेत विजय सूर्यवंशी?

मिळालेल्या माहितीनुसार, विजय सूर्यवंशी हे महाराष्ट्र कॅडरचे 2006 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागात सुरुवातीला कार्यरत होते. त्यांच्याकडे एमबीए आणि पीएचडी ही पदवी आहे.

 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?

आयएएस अधिकारी विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीये.

महापालिकेचे प्रभारी आयुक्त कोण होते?

श्रावण हर्डीकर हे याआधी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT