Neral Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Mahendra Thorve Video: शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाकडून कार चालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे गटाने सरकारला सुनावलं

UBT Shivsena on Mahendra Thorve : शिवसेनेच्या आमदाराकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

UBT Shivsena on Mahendra Thorve:

शिंदे गट शिवेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाने एका कार चालकाला रॉडने मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवेसेनेने ट्वीटरवर पोस्ट केलाय. नेरळमधील भररस्त्यात आमदाराच्या बॉडीगार्डने मारहाण केलीय. व्हि़डिओ पोस्ट करत ठाकरे गटाने सरकारला चांगले खडेबोल सुनावलेत. सरकारवर टीका करत ठाकरे गटाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत.

पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ हा नेरळमधील असल्याचं सांगितलं जात आहे. "मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!", असा आशय लिहित ठाकरे गटाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एका कारमध्ये एक व्यक्ती बसलाय. त्याच्यासोबत वाद झाल्यानंतर एक व्यक्ती त्याला मारहाण करत आहे. हातात दंडुका घेऊन तो व्यक्ती त्या व्यक्तीला मारहाण करत आहे.

दरम्यान या व्हिडिओवरून ठाकरे गटाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिवा असं महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचं नाव आहे, त्याच्याकडून ही मारहाण केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात गॅगस्टर ! शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाच्या अंगरक्षकाने नेरूळमध्ये भरदिवसा एका व्यक्तीला मारहाण करत आहे. मारहाण होत असताना त्या चालकाच्या कारमध्ये त्या व्यक्तीची पत्नी आणि दोन दोन मुले होते. ते रडत होते. परंतु त्या चालकाच्या मदतीला कोणी आलं नाही. येथील कायदा व्यवस्था कोलममडलीय. हे फक्त कर्जतमध्ये नाही तर संपूर्ण राज्यात गुंडागर्दी वाढलीय असा टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी केलीय.

आमदारांनी मात्र आरोप फेटाळले

हे कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात झालेले मतभेद आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ते असंच सांगत असतात. ज्याला मारहाण झाली आणि ज्याने मारहाण केली ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत. त्यांचे मतभेद झालेत. नेमकं काय झालंय याबाबत मला कल्पना नाहीये. मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो, आता गेल्यानंतर त्याबाबतची माहिती घेईल. आम्हाला सत्तेची मस्ती वगैरे नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. ठाकरे गट त्याच भांडवल करत असल्याचं थोरवे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT