lok sabha election mahayuti seat sharing formula is decided Saam Tv
मुंबई/पुणे

Lok Sabha Election: महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? भाजपला 24, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा?

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Lok Sabha Election 2024:

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या वर्षावर झालेल्या बैठकित भाजपकडून मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत नवा फाॅर्म्युला ठेवण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात युतीतील तिन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडे असलेल्या जागांवर युतीतील तीन पक्षापैकी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्याला ती जागा देण्यावर चर्चा झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण किती जागांवर निवडणूक लढवणार?

यासाठी महाविकास आघाडीकडे सद्या असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात युतीतील कुठल्या पक्षाचा प्रभाव अधिक आहे. याचा तीनही पक्षाकडून सर्वे करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून भाजप २४, शिंदे १४ आणि अजित पवार गटाला १० जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभा जागा मिळाव्यात यासाठी महायुतीत अजित पवार गट आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

मनसे महायुतीत होणार सामील?

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेने आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत सामील होईल, अशी चर्चा आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी राज ठाकरे यांची जवळीक असल्याचं बोललं जातं. यातच शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज ठाकरे यांच्याशी तब्बल सहा वेळा भेट झाली आहे. दोन्ही नेते अनेकवेळा एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही हजार राहिल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळालं आहे.

यातच २८ डिसेंबर रोजीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी मराठी पाट्या, टोल, धारावी पुनर्विकास प्रकल्प यांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT