सुशांत सावंत
Mahavitaran News : महावितरणची खेळत्या भांडवलाची आर्थिक चणचण लवकरच दूर होणार आहे. महावितरण वन टाईम सेटलमेंट योजनेतून निधी उभारणार आहे. तर महावितरण थकबाकीची वसुली ग्रामविकास व नगरविकास विभागाकडून करणार आहे. यामुळे महावितरणला मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)
महावितरणने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. ३१ मार्च २०२० रोजी ३९ हजार १५२ कोटी असलेल्या कर्जाचा डोंगर कोरोनामुळे ३० जून २०२२ रोजी ५३ हजार ३६९ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. याउलट महावितरणची वीज बिला पोटी ग्राहकांकडून येणारी थकबाकी ३१ मे २०२२ पर्यंत ६७ हजार १४९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
महावितरणकडे रोखीचा तुटवडा निर्माण होण्यामागे ही थकबाकी कारणीभूत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांमुळे महावितरणला कर्ज उभारणी करणे अशक्य झाले असून राष्ट्रीयकृत बँकाही महावितरणला कर्ज देत नसल्याचे समोर आले होते. म्हणूनच ग्रामविकास विभाग व नगरविकास विभागाकडील थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वन टाईम सेटलमेंट योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेमुळे महावितरणच्या तिजोरीत ग्रामविकास विभागाकडून ३ हजार ७७५ कोटी, तर नगरविकास विभागाकडून १८६ कोटी रुपये जमा होणार आहेत. परिणामी, महावितरणची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे महावितरणला मोठा दिलासा मिळणार आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ४ जानेवारी रोजी संप पुकारला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जानेवारी रोजी दुपारी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली. क घेतली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर संपावर यशस्वी तोडगा निघाला असे त्यावेळी सूत्रांनी सांगितले. महावितरणच्या जवळपास ३२ कर्मचारी संघटना या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.