Maharashtra Politics : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर येणार? काय आहे कारण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv

निवृत्ती बाबर

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पुण्यात एकाच कारतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. एका कार्यक्रमाच्या मंचावरही एकत्र दिसले. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Prakash Ambedkar Exclusive : समान नागरी कायद्यावर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? पाहा व्हिडिओ

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ तारखेला एका कार्यक्रमाचे आयोजन विधानभवनात करण्यात आले आहे. या कार्यक्रमातील व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. विधान भवन येथील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावर 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी होणार आहे.

राज्यात सत्तातंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता असल्याने सर्वांची उत्सुकता वाढली आहे. 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती.

या कार्यक्रमाचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics
Aaditya Thackeray : 'खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय'; आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर मोठा आरोप

दरम्यान, 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरणाच्या कार्यक्रमाबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, '२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र एका कार्यक्रमात येत आहेत. जे बाळासाहेब ठाकरे यांना मानतात, त्यांना आदर्श ठेवत हा उपक्रम आहे. त्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com