मुंबई/पुणे

Maharashtra Political News : महाविकास आघाडीचं ठरलं! लोकसभेच्या कोण किती जागा लढणार? आकडे आले समोर

Mahavikas Aghadi Loksabha Election 2024 : जागावाटप करत असताना २०१९ साली ज्या जागा निवडून आल्यात त्या जागा त्याच पक्षाला देणार असल्याचं ठरलं असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.

प्रविण वाकचौरे

गिरीश कांबळे

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे जात राज्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीत अंतर्गत वाद बाजूला ठेवत ताकदीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झालं असल्याची माहिती समोर आली आहे. ताकद कमी असलेल्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकांसाठी ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार लोकसभेच्या ४८ जागा लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. ४८ जागांपैकी ठाकरे गट २० जागांवर निडवणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसच्या वाट्याला १६ जागा येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने २ जागा त्यांना दिल्या जाणार आहेत.

जागावाटप करत असताना २०१९ साली ज्या जागा निवडून आल्यात त्या जागा त्याच पक्षाला देणार असल्याचं ठरलं असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

SCROLL FOR NEXT