MVA  Saam TV
मुंबई/पुणे

MVA Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी, मात्र 'या' पाच अटींचं पालन करावं लागणार

महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडीचा महामोर्चा (Mahavikas Aghadi) उद्या १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला पोलिसांनी देखील परवानगी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोर्चाला परवानगी देतांना पोलिसांनी पाच मुख्य अटी लागू केल्या आहेत. या अटींचं पालन करण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असणार आहे.  (Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला कोणत्या अटी व शर्तींच्या आधारे परवानगी?

>> यात प्रामुख्याने मोर्चाला मार्गदर्शन करताना नेत्यांनी कुठलेही आक्षेपार्ह विधान करू नये. जेनेकरून दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही.

>> मोर्चात आर्म अॅक्टनुसार कुठलीही घातक शस्त्र आणू नयेत किंवा वापरू नये. उदा चाकू, तलवार आणि अन्य शस्त्रे.

>> मोर्चा दरम्यान कुठेही फटाके फोडू नये.

>> दिलेल्या मार्गानुसारच मोर्चा पुढे जायला हवा.

>> त्याच बरोबर कायदा व सुव्यवस्थेचे उल्लघंन होणार नाही व सर्व नियमांचे पालन करावे, अशा अटीच्या आधारे मोर्चाला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असा असेल पोलिस बंदोबस्त

महाविकास आघाडीच्या मोर्चाला दोन-अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त 4 ते 5 पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे.

या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलीस आवाहन करणार आहेत. सोबतच या मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.

उद्याच्या महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी कडक पोलिस बंदोबस्त असला तरी महाविकास आघाडीकडून नेत्यांना संरक्षण देण्यासाठी 150 सूरक्षा रक्षकांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 50 सदस्य टीममध्ये सहभागी झाले आहेत. मोर्चापूर्वी महाविकास आघाडीतील सर्व सदस्य एकत्र एकाठिकाणी जमतील आणि त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीतील सुरक्षा रक्षक सुरक्षा देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT