Lok Sabha Election 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Lok Sabha Election 2024: 'वंचित' फॅक्टरचा महाविकास आघाडीला मोठा फटका; राज्यात कोणत्या चार जागा गमावल्या?

Mahavikas Aghadi Loss Due To Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चार जागांवर वंचित बहुजन आघाडीचा फटका बसल्याचं समोर आलं आहे. या जागा कोणत्या आहेत, ते आपण पाहू या.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची साथ सोडली अन् एकला चलो रे ची भूमिका घेतली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं नाही. परंतु त्याचा फटका महाविकास आघाडीला चार जागांवर बसला आहे. मुंबई उत्तर पश्चिम, अकोला, हातकणंगले आणि बुलढाण्यात वंचितचा फटका मविआला बसल्यातचं दिसत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीने वंचितला ५ ते ६ जागांची ऑफर दिली होती. मात्र, जागावाटपावरून त्यांची बोलणी फिसकटली अन् वंचिनतने निवडणूक एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात वंचितने एकूण ३५ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर, सहा जागांवर माविआला पाठिंबा दिला होता. कोल्हापुर, सांगली, बारामती आणि नागपुरमध्ये त्यांनी उमेदवारांना पाठिंबा दिला होता, तिथे वंचितचे उमेदवार उभे नव्हते.

मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला आहे. तिथे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) परमेश्वर रणशुर यांना १००५२ मतं मिळाली आहेत, त्यामुळे हा मविआला (Mahavikas Aghadi) मोठा फटका मानला जात आहे. तर अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे यांचा ४०६२६ मतांनी विजय झाला आहे. तिथे तिसऱ्या क्रमांकावरील प्रकाश आंबेडकरांना २,७६,७४८ मतं मिळाली आहेत.

हातकणंगलेत ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा १३,४२६ मतांनी पराभव झाला आहे. तिथे वंचितच्या डी सी पाटिल यांना ३२,६९६ मतं मिळाली आहेत. बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा २९,४७९ मतांनी पराभव झाला (Maharashtra Politics) आहे. तिथे वंचितच्या वसंतराव मगर यांना ९८,४४१ मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडीत वंचितच्या सहभागाला घेऊन मवीआचे नेते आग्रही होते. या लोकसभेत वंचितच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT