महाविकास आघाडी म्हणजे कुठेही न जाणारी पंक्चर रिक्षा; अमित शहांची टीका SaamTV
मुंबई/पुणे

महाविकास आघाडी म्हणजे कुठेही न जाणारी पंक्चर रिक्षा; अमित शहांची टीका (पहा Video)

मी 2019 ला राज्यात आलो होतो. तेव्हा निर्णय झाला होता की फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येईल. मात्र आता शिवसेनेने (Shivsena) शब्द फिरवला. हिंदुत्वाशी गद्दारी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : आज पुण्यात भाजपच्या कार्यकर्ता संमेलनामध्ये मार्गदर्शनपर भाषणामध्ये बोलताना अमित शहा (Amit Shah) यांनी महाविकास आघाडी सरकारसह देशातील काँग्रेसवरती जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'जगात आता भारताच्या पासपोर्टची किंमत वाढली आहे आता बाहेरच्या देशातील लोक विचारतात की मोदींच्या देशातून आला का, याआधी कॅाग्रेसची सत्ता होती. त्यांच्या सत्तेमध्ये मोठे भ्रष्टाचार झाले. आतंकी हल्ले व्हायचे पण मौनी बाबांचं तोंड उघडायचं नाही मात्र उरीचा हल्ला झाला तेव्हा अतिरेक्यांना कळालं की मौनीबाबा पंतप्रधान नाही तर मोदींच आहे. अशी टीका त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या वरती केली.

पहा व्हिडीओ -

तसंच आम्हांला काँग्रेसवाले (Congress) विचारायचे की राम मंदिर कधी होणार? टीका व्हायची की भाजपसाठी राममंदीर हा फक्त निवडणुकीचा मुद्दा आहे. मात्र आम्ही आता जे बोललो ते सत्य करुन दाखवलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, मी 2019 ला राज्यात आलो होतो. तेव्हा निर्णय झाला होता की फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येईल. मात्र आता शिवसेनेने (Shivsena) शब्द फिरवला. हिंदुत्वाशी गद्दारी केली. ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष बसले त्यांच्या मांडीवरती जाऊन बसले, त्यावेळी आम्ही भर सभेत सांगितलं की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री बनतील मात्र तरिही त्यांनी मला खोटं ठरवलं असल्याचा आरोप केला.

हिम्मत असेल तर राजीनामा द्या -

महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी सरकार हे तीन चाकी सरकार आहे. ज्यांची तिन्ही चाकं विरुद्ध दिशेला असतात असं मी मागे म्हणालो होतो. मात्र आता मी माझ वक्तव्यं दुरुस्त करतो ते म्हणाले. 'मला आता कळालंय हे सरकार तीन चाकी रिक्षा आहे पण त्याची चाकं पंक्चर आहेत. ते कुठेच जात नाही. फक्त प्रदुषण करतात असा घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. तसंच राज्यातल्या सरकारच्या विरोधातली लढाई पुण्यात विजय मिळवून सुरुवात करा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं तसंच हिम्मत असेल तर राजीनामा द्या; तिघं एकत्र लढा. बघू कोण जिंकतंय असं आव्हानच त्यांनी महाविकास आघाडी सरकारला यावेळी दिलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT