AJIT PAWAR CAMP SUFFERS MAJOR SETBACK AS HUNDREDS OF WORKERS JOIN SHARAD PAWAR FACTION IN THANE 
मुंबई/पुणे

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

Ajit Pawar NCP Thane Youth President Joins Sharad Pawar Group: ठाण्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला राजकीय फटका बसलाय. कारण युवा अध्यक्ष विरू वाघमारे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Bharat Jadhav

  • ठाण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय.

  • डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय समीकरणात मोठा बदल

विकास काटे, साम प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा आपल्याच घरट्यात परतात; तसेच विरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघे घरी परतले आहेत. विशेष म्हणजे, विरूला त्याच्या आईनेच परत पाठविले आहे, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. (Thane Youth President Viru Waghmare Joins Sharad Pawar Camp)

राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरू वाघमारे हे राष्ट्रवादीच्या विभागणीनंतर अजित पवार गटात गेले होते. तर, हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची वाट धरली होती. मात्र, ठाणे शहरातील राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करीत युवक अध्यक्ष विरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांनी बुधवारी सायंकाळी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांचा प्रवेश हा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाची एक खास भेट ठरलीय. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. अखेरीस निजामाच्या तावडीतून सुटका झाली, असे विरू वाघमारे यांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात खळबळ

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि कट्टर कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता, त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना तडीपार व्हावे लागले होते. आव्हाड यांच्यासाठी आपल्या अंगावर गुन्हे दाखल करून घेणारे हे दोन्ही कट्टर कार्यकर्ते अजित पवार गटात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, आमदारासह एसीपी, डीसीपी घटनास्थळावर, राज्यात खळबळ

Maharashtra News Live Update : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदेसेना आक्रमक

Rain Alert : राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Accident : पहाटे महामार्गावर भीषण थरार! ४३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयानक अपघात; ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ हादरले! पहाटे ५ वाजता झोपेत असताना कानाला झाला सर्पदंश; 'मण्यार' सापाच्या विळख्याने ११ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू

SCROLL FOR NEXT