Sky Dining Hotel Maval, Pune दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Sky Dining: हवेत बसून जेवणार का? 120 फूट उंचीवर महाराष्ट्रातलं पहिलं स्काय डायनिंग हॉटेल पुण्यात!

First Sky Dining Hotel of Maharashtra: सुरक्षिततेच्या दृष्टीने खुर्चीवर बसल्यानंतर सीट बेल्ट्स लावले जातात. त्यानंतर हे हॉटेल आकाशात झेप घेते.

दिलीप कांबळे

मावळ, पुणे: १२० फूट उंचीवर थरार अनुभवत तुम्ही कधी जेवणाचा आस्वाद घेतलाय का? (Sky Dining) आता तुम्ही म्हणाल की एकतर हा प्रश्नच चुकीचा आहे. अन् असं कोणी वेडं धाडस केलं असेल तर तो स्वतःच्या जीवावर उदार झाला असेल. पण आम्ही म्हणतोय की, हे तुम्हीही अनुभवू शकता! ते ही सुरक्षितरीत्या. तर मग.... मग काय? बघायचंय हा थरार कसा आणि कुठं आहे, शिवाय तिथं जेवणाचा आस्वाद कसा घेता येईल ते? त्यासाठी वाचा ही स्पेशल स्टोरी... (Sky Dining Hotel In Pune)

हे देखील पाहा -

तुम्ही बऱ्याच ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला असेल. खानावळ, ढाबा, साधे हॉटेल, अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये ही तुम्ही गेलेला असाल. परंतु आज आम्ही तुम्हाला एक असं हॉटेल दाखविणार आहोत. जे महाराष्ट्रात तुम्ही कुठं पाहिलंही नसेल, अनुभवलंही नसेल. आतापर्यंत मलेशिया,सिंगापूर,दुबई या देशात अशा प्रकारची हॉटेल्स आहेत. मात्र महाराष्ट्रात प्रथमच मावळमध्ये (Maval) आकाश जाधव (Akash Jadhav) या खवय्याने हे हॉटेल तयार केले.

First Sky Dining Hotel of Maharashtra

या स्काय डायनिंग हॉटेलमध्ये खवय्यांची खास सेवा केली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने खुर्चीवर बसल्यानंतर सीट बेल्ट्स लावले जातात. त्यानंतर हे हॉटेल आकाशात झेप घेते. परंतु हात थरार फारच वेगळा असतो. हे हॉटेल १२०  फूट उंचीवर पोहोचते. वर जाऊन ३६० डिग्रीमध्ये हे हॉटेल फिरवले जाते, त्यामुळे थरारासह निसर्गाचा आनंद घेता येतो.

Sky Dining Hotel In Pune

पृथ्वी रोज सूर्याभोवती फिरते मात्र ते आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे हे हॉटेल आहे. हॉटेल फिरते पण आपल्याला काळतही नाही. या हॉटेलला स्काय डायनिंग हॉटेल असं म्हटलं जातं. मावळातील कासारसाई धरणाजवळ हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. अतिशय विहंगम आणि नयनरम्य दृश्य बघायला मिळते. याच वातावरणात खवैये या स्काय डायनिंगच्या टेबलवर बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात.

Sky Dining Hotel In Maval

या हॉटेलमध्ये एकावेळी २२ जण बसून जेवण करू शकतात. त्यामुळं या स्काय डायनिंग हॉटेलमध्ये तुम्ही बसलात की, आपसूकच तुमच्या तोंडात हे शब्द येतील... काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल अन् काय ते धरणाचं पाणी... सगळं एकदम ओक्के आहे!!!

Sky Dining Hotel View
Sky Dining Hotel Food

पाहा व्हिडिओ -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

SCROLL FOR NEXT