Maharashtra Weather Today Rain Alert Yellow Alert & Monsoon Update AI Image
मुंबई/पुणे

Rain Update : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोर धरला, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला यलो अलर्ट असून विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भ-मराठवाड्यात उष्णता कायम राहण्याचा अंदाज.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

  • सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला यलो अलर्ट

  • कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, विजांचा कडकडाट

  • विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच वातावरणातील बदलांचा परिणाम राज्याच्या विविध भागांमध्ये जाणवत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पावसापेक्षा उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. या भागांसह राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून, काही भागांत उन्हाचा चटका जाणवण्याचा अंदाज आहे.

राज्यातील कमाल तापमानाचा विचार केला तर अमरावती येथे सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ धुळे ३६ अंश, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर ३५.८ अंश, अकोला ३५.७ अंश, चंद्रपूर ३५.४ अंश, तर जेऊर येथे ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. एकीकडे काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा कायम असल्याने राज्यात सध्या विरोधी हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या परतीचा प्रवास वेग घेत असताना हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक

Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

Imarti Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि रसाळ इमरती,वाचा रेसिपी

Thane News: ठाणे हादरले! शिवसेना नेत्याचा गोळीबारात मृत्यू, १ मिनिटं २ सेकंदाचा थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT