Maharashtra Weather Update News Today Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Weather Update : राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू, बळीराजा चिंतेत; जोरदार पाऊस कधीपासून? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Today Weather Update News : महाराष्ट्रात अनेक भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

  • राज्यात उकाड्यात वाढ

  • पालघर, रायगड, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि जालना येथे पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update Today यंदा मान्सूनची एंट्री महाराष्ट्रात उशिराने झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र गेले काही दिवस मान्सूनने दडी मारली आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. प्रशांत महासागरात घोंगावणाऱ्या वादळाचे आणि अल निनोचा हा परिणाम असल्याचं हवामान विभागाने म्हटले. सध्या वातावरणात ऊन सावलीचा लपंडाव चालू असून आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात अनेक भागांमध्ये पावसाला पोषक हवामान तयार होत असले तरी बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने कमाल तापमानाचा पारा ३७ अंशपर्यंत पोहोचला असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विशेषतः कोकणातील पालघर आणि रायगड जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये मात्र पावसाची उघडिप राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता असली तरी व्यापक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलै नंतरच महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT