Maharashtra in weather Yandex
मुंबई/पुणे

Weather Alert : ढग गडगडले, आभाळ आले दाटून; राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी व्यक्त केलाय.

Satish Daud

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला. रविवारी पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं. सांगली जिल्ह्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय. आज सोमवारी देखील राज्यात जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलंय.

हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार, आज सोमवारपासून पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस (Heavy Rain) होणार असल्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज होसळीकर यांनी व्यक्त केलाय.

मागील आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याची तीव्रता आहे. कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. परिणामी मुंबई, पुणे, कोकण, रायगड ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे.

हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी खानदेशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे तसेच नाशिक जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT