Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: विधानसभेसाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता, बड्या नेत्यांच्या घेणार भेटीगाठी

Uddhav Thackeray On Delhi Visit For 3 Days: उद्धव ठाकरे आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. तीन दिवस ते दिल्लीमध्ये असणार आहे.

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही पुणे

राज्यात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने देखील या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज दुपारी दिल्ली येथे (Maharashtra Politics) पोहचतील. आपल्या तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात ते इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मलिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात जागावाटपाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

राजकीय घडामोडींना वेग

या तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यात (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे आज दिल्लीतील मराठी माध्यमांशी तर उद्या राष्ट्रीय मीडियाशी संवाद साधणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडमध्ये

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्शनमोडमध्ये आल्याचं दिसत आहेत. या दौऱ्यामध्ये राजकीय चर्चा आणि बैठका होणार असल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा एक प्रकारे राजकीय संवाद भेट असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. या दौऱ्यात विधानसभेसाठी महाविकास आघाडीची रणनिती ठरली जाईल, असं बोललं जात आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळाचं उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे लक्ष (INDIA Aghadi) लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT