मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे (Congress) आक्षेप फेटाळले आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप नोंदवला होता. हा आक्षेप राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. यानंतर काँग्रेसने केंद्रीय निवडणूक (Election) आयोगाकडे तक्रार दिली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळला आहे.
आज विधानपरिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीवरुन (Election) महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांविरोधात आक्षेप नोंदवला. या संदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला तक्रार दिली होती. या संदर्भात आता निवडणूक आयोगाने निर्णय घेणार घेतला आहे. (Maharashtra Legislative Council Elections)
काँग्रेसने भाजपच्या (BJP) दोन मतांवर आक्षेप घेतला होता. यावर बोलताना अतुल लोंढे म्हणाले, हे गुप्त मतदान आहे, यात कोणाचीही मदत घेता येत नाही. हे अशा पद्धतीने मतदान करणे चुकीचे आहे. नियमाच्या बाहेर जावून मतदान करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची दोन मत रद्द झाली पाहिजेत. त्यांनी आयोगाकडे काही तशी मदत मागितली होती का हे पाहावे लागणार आहे.
मत पत्रिका वाचून त्यावर सही करावी लागते आणि मत देताना ते गुप्त करावे लागते, हे मत त्यांनी दाखवून केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे, त्यामुळे यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी एक, एक मत हे महत्वाचे आहेत.
या संदर्भात बोलताना भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले, त्यांनी कशा पद्धतीने मतदान केले हे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. काँग्रेस हा एक वेगळ्या मानसिकतेचा आहे आहे, त्यामुळे त्यांनी हा आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्यावर आमचा विश्वास आहे, असंही भातखळकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.