Maharashtra Rain Update Yandex
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Update: तापमान वाढलं! मुंबईकर पुन्हा घामाघूम होणार, नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

Hailstorm And Heat Wave Alert: आज राज्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. दुहेरी वातावरण पाहायला मिळतंय.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

आज राज्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. दुहेरी वातावरण पाहायला मिळतंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Maharashtra Rain Update) दिला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाटसदृश वातावरणाचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेसाठी येलो अलर्ट आयएमडीने दिला आहे. नगर आणि नाशिकमध्ये गारपीट (Hailstorm Forecast) तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. जळगाव, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, धाराशिव, लातूर, धुळे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, (Maharashtra Weather Update) हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम आहे.

पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. मुंबईत मात्र उकाडा कायम राहणार आहे. राज्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच मोसमी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता (Heat Wave Alert) आहे. तर १९ मेपर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी शीतल वातावरण आहे. परंतु उकाड्यापासून पुर्णपणे अजून सुटका झालेली नाही. वादळी वाऱ्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT