Maharashtra Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार; कोकणात पुरस्थिती, NDRFच्या पाच तुकड्या तैनात

कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे, चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी पावसामुळे चिपळूण शहरात हाहाकार माजवला होता. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल रत्नागिरी, रायगड, चिपळूण या परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. या परिसरातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

रायगडमध्येही मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. रायगडमध्ये प्रशासन सज्ज झाले आहे. महाडमध्ये ९, पोलादपूरमध्ये १३, माडगाव मध्ये १ अशा २३ गावांमधील सुमारे १५५३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तर २५ जवानांसह एनडीआरएफसहच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवरुन दिली आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. तीन ठिकाणी दरड कोसळलेली आहे. त्यामुळे वाहुक बंद करण्यात आले आहे. या घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू होते. रत्नागिरी जिल्ह्याला अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. राजापुरातील (Rajapur) अर्जुना आणि कोलवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहराला पुराचा विळखा बसला आहे.

पोलदपूर तालुक्यातील चोळई गावाला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण चोळई गावाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूवात झाली आहे. सलग २४ तास पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. १२ तासांत पंचगंगा नदीची पाणी पातळी ८ फुटांनी वाढली आहे. नदीकाठच्या नागरिकांना पात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे.

खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी

मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेस्थानकात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत, पण पावसाचा जोर कायम आहे.

संध्याकाळी सर्व ऑफीस सुटलेले असतात त्यामुळे रेल्वेस्थानकात गर्दी असते. त्यामुळे काल या रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होती. दोन दिवसापूर्वी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागात मुसळधार पावसाचा (Rain) इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT