MAHARASHTRA MONSOON UPDATE: IMD ISSUES ORANGE ALERT FOR HEAVY RAIN IN MULTIPLE DISTRICTS  Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Maharashtra Weather Update News : राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरत अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे

  • विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

  • पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार

राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून आज अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, जळगाव, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत जोरदार सरींसह पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, नंदूरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने ठिकठिकाणी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र पुराचा धोका टळला असून पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे IMD ने म्हटले आहे. दरम्यान पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच राहणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

बँकांचा खातेदारांच्या 26 हजार कोटींवर डल्ला; किमान शिल्लकच्या नावाखाली वसुली

SCROLL FOR NEXT