Maharashtra Politics Three intervention petition by Ajit Pawar group in Supreme Court Sharad Pawar NCP Crisis saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवार गटाची सर्वात मोठी खेळी, सुप्रीम कोर्टात 3 हस्तक्षेप याचिका; शरद पवारांचं टेन्शन वाढणार?

Ajit Pawar Supreme Court Petition: सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच अजित पवार गटाने सर्वात मोठी खेळी खेळली आहे.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Ajit Pawar Group Supreme Court Petition

आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केली. या याचिकांवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीआधीच अजित पवार गटाने सर्वात मोठी खेळी खेळली आहे.  (Latest Marathi News)

अजित पवार गटाकडून (Ajit Pawar) सुप्रीम कोर्टात 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, नरहरी झिरवळ आणि अनिल पाटील यांच्या वतीने यांच्या वतीने या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर आजच सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल झालेलं आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यात आहे. त्यामुळे आम्हाला यामध्ये बोलण्यात स्कोप मिळत नाहीये. आम्हाला आमचं मत मांडायचं आहे. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती देखील अजित पवार गटाकडून कोर्टात करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे दाखल केलेल्या तीन हस्तक्षेप याचिका कोर्टाने स्वीकारल्या, तर त्यांच्या वतीने 3 वकील बाजू मांडणार आहे. त्यामुळे कोर्ट यावर काय निर्णय घेतं? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. विधासभा अध्यक्ष यांनी अजून कोर्टासमोर रूपरेषा दाखल केली नाही. कोर्ट नार्वेकर यांना निर्देश देऊ शकत, निर्णय देऊ शकत नाही नाही, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितलं आहे.

शरद पवार गटाने आपल्या याचिकेत काय म्हटलंय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वारंवार पत्राद्वारे विनंती करूनही आमदारांच्या अपात्रतेवर वेळकाढूपण केला जात असल्याचा मुद्दा शरद पवार (Sharad Pawar) गटाने कोर्टासमोर मांडला आहे. हाच मुद्दा ठाकरे गटाने सुद्धा मांडला असून आज या दोन्ही प्रकरणावर एकत्रित सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांची याचिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

SCROLL FOR NEXT