Pune Politics: Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Vasant More Detained: पुण्यातील शिवसेना ठाकरेसेनेचे नेते वसंत मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.

Priya More
  • वसंत मोरे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • पुणे पोलिसांनी केली कारवाई

  • अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी वसंत मोरेंना घेतलं ताब्यात

  • अमित शाह पुणे दौऱ्यावर आले आहेत

पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते आंदोलन करणार होते. या आंदोलनापूर्वीच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांना अटक करत पोलिसांनी स्वारगेट पोलिस चौकीत नेले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महर्षी नगर येथील महाराष्ट्र मंडळ मैदानावर हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकात पाटील, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.

अमित शाह यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध केला जाणार असल्यामुळे पुण्यात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते रस्ता आडवणार होते. त्यापूर्वीच रात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण आज सकाळी दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या ताफ्यापुढे काळे फुगे सोडले. अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्याऐवजी काळे फुगे सोडून त्यांनी निषेध नोंदवला.

अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले होते. वंचित बहुजन आघाडीने अमित शहांचा ताफा येण्यापूर्वी रस्ता अडवला. यावेळी त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड चौकात निदर्शन केली आणि अमित शहांच्या दौऱ्याला विरोध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT