Sanjay Raut Claim On Devendra Fadanvis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या कायद्याची धिंड काढली ; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Criticized PM Modi Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. नागपूर हिट अॅंड रन प्रकरणानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.

Rohini Gudaghe

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

नागपूर हिट अॅंड रन प्रकरणात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव येत आहे, त्यामुळे प्रकरण दाबलं जातंय. असा आरोप विरोधक करत आहेत. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आता सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायद्याची धिंड काढली, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

रस्त्यावर एखादा अपघात सामान्य माणसाने केला असता तर काय झालं असतं? एवढ्यात पोलिसांनी (Maharashtra Politics) त्याच्या कुटुंबाला, मित्राला रस्त्यावर बघून धिंड काढली असती. परंतु, सलमान खान सुटतो. एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो. कोणाचाही मुलगा असू दे, कायदा सर्वांसाठी सामान व्हावा अशी मागणी राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय.

संजय राऊतांचा हल्लाबोल

लाहोतीरी बार बिल भरायला पाहिजे, त्याच्याबरोबर बीफ कटलेट याचं देखील बिल आहे. हिंदुत्ववादी लोक आहेत. हे सगळ्यांना मॉफ ब्लीचिंग करतात, असा आरोप त्यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही आमच्या अनिल देशमुख यांना अटक करायला निघाले होतात. चार वर्षांपूर्वी एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील, असं देखील राऊत म्हणाले आहेत. पण तुमच्या डोळ्यासमोर लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुम्ही अभय देत आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

पीएम मोदींच्या राजीनाम्याची मागणी

मणिपुर हा या हिंदुस्तानचा एक महत्त्वाचा भाग (Nagpur Hit And Run) आहे. गेल्या अडीच वर्षापासून पंतप्रधान मोदींना मणिपुरमधील हिंसाचार थांबवता आलेला नाही. हे त्यांना स्वीकारता आलं पाहिजे. पीएम मोदी अजून मणिपुरला गेलेले नाही. परंतु एअर इंडिया वन घेऊन ते जगभरात फिरत आहेत. मणिपुरमध्ये बॉम्बहल्ले होत आहेत, विद्यार्थ्यांना मारहाण केली जातेय. मोदींनी मणिपुरला जावं किंवा नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT