मयूर राणे, साम टीव्ही मुंबई
धारावी पुनर्वसन प्रकल्प नसून लुटमार योजना आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई अदाणीला मुंबई विकू इच्छित आहेत, पण आम्ही ते होऊ देणार नाही. धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने इतर काही ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणासमोर आली आहेत, मी सांगेन लवकरच असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले. मुंबई एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात आम्ही घालू देणार नाही, त्यांच्या मागे कितीही मोठी शक्ती असू द्या. आम्ही लढू, असं देखील राऊत म्हणाले आहेत.
धारावी पुनर्वसन प्रकल्प
धारावी हा मुंबईसाठी महत्वाचं प्रकल्प आहे. धारावीतील सर्व जातीधर्माच्या लोकांना ५०० फुटांची घरं मिळावी, या पुनर्वसन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असण्याचं कारण नाही, अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. किंबहुना या प्रकल्पासाठी शिवसेनेने मोर्चा देखील काढला होता. परंतु हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जावू (Maharashtra Politics) नये. या प्रकल्पामुळे उद्योगपतींनी मुंबई विकली जावू नये, ही भूमिका असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलंय.
संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
भारतीय जनता पक्षाला काही काम नाही. तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावत आहे. फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवायला हवं, असा घणाघात राऊतांनी (Vidhan Sabha Election) केलाय. मुंबईत याआधी सुद्धा अनेक पुनर्वसन प्रकल्प राबवले गेलेले आहेत. ते प्रकल्प म्हाडाच्या मदतीने राबवले गेले आहेत. पण एका उद्योगपतीला इतका मोठा भूखंड आणि त्याच्याबरोबर २० भूखंडांचं दान हे आम्ही प्रथमच पाहत आहोत, ही लूट असल्याची टीका त्यांनी केलीय.
राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते महाशय स्वतंत्रपणे २८८ जागा लढणार आहेत. देवाण-घेवाण चालूच राहते. स्वतंत्र लढणार त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी काहीतरी दिलं पाहिजे अशी टीका राऊत यांनी केलीय. ही देवाण-घेवांची चर्चा बंद दारात होत असते. महाराष्ट्राच्या हितासाठी, सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले, असा काही इतिहास नसल्याचा टोला देखील राऊतांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहा यांना भेटले. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले. महाराष्ट्रातल्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असतील, तर इतिहास माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.