Ravindra Waikar News Saam Tv
मुंबई/पुणे

Ravindra Waikar News: रविंद्र वायकर यांना मोठा दिलासा; भूखंड घोटाळ्याच्या आरोपाविरोधात मुंबई महापालिका पुनर्विचार करणार

Ravindra Waikar Land Scam: जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याचा एफआयआर दाखल करणारी पालिका आत आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याचा प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. २५ फेब्रुवारी २०२४

Ravindra Waikar News:

कथित भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याचा एफआयआर दाखल करणारी पालिका आत आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याचा प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळ्याचा एफ आय आर दाखल करणारी पालिका आता आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याच्या तयारीत आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याची सुनावणी आता सोमवारी पार पडणार आहे. या सुनावणीत पालिकेने तक्रार मागे घेतल्यास रविंद्र वायकर यांच्यावरील ईडीचा गुन्हा देखील रद्द होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रविंद्र वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळेच पालिकेने युटर्न घेतल्याच्या चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहेत आरोप?

दरम्यान, जोगेश्वरी येथील वेरावली गावातील भूखंडाचा गैरवापर करणे आणि त्रिपक्षीय कराराची तथ्य लपवून भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची पालिकेकडून परवानगी मिळवल्याचा आरोप आमदार रविंद्र वायकर यांच्यावर आहे. उद्याच्या सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT