Aaditya Thackeray and Amit Thackeray emerge as the key strategists as the Thackeray family launches an aggressive campaign for the Mumbai civic elections. Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईसाठी ठाकरेंच्या दोन पिढ्या मैदानात, प्रचाराची धुरा नव्या ठाकरेंकडे

Mumbai BMC Elections: मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाच प्रचारासाठी एक नवी ऱणनीती आखण्यात आलीय... ठाकरेंचे करण- अर्जुन मुंबईत नेमका कसा करिष्मा घडवून आणणार

Snehil Shivaji

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती करत निवडणुकांना सामोरं जाण्याचं ठरवलं. या युतीसाठी ठाकरे बंधुंनी चर्चा आणि मनोमिलनावरच ६ महिने घालवले. कार्यकर्त्यांचं मन वळवण्यात काहीअंशी ठाकरे यशस्वी झाले तरी युतीचा अंजेडा मतदारांपर्यंत पोहचवण्याचं एक मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे. कारण पुढील 20 दिवसात ठाकरेंना ठाकरे ब्रँण्ड वाचवण्यासाठी मोठी घोडदौड करावी लागणारेय. महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंचे करण अर्जुन अँक्शनमोड मध्ये आलेत.

प्रचाराची धुरा नव्या ठाकरेंकडे

अमित - आदित्य ठाकरे ठरवणार प्रचाराची दिशा

मातोश्रीवर आदित्य आणि अमित ठाकरेंची बैठक

अमित-आदित्य ठाकरे करणार रोड शो, प्रचार रॅली

संपूर्ण प्रचाराचं नियोजन 2 दिवसांत पूर्ण करणार

उद्धव आणि राज ठाकरेंचा सभांवर भर

शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मागे सावलीप्रमाणे वावरले. डोळ्यात डोळे घालून त्यांनी विरोधकांना टशन दिली तर विधानसभा निवडणूकांमध्ये अमित ठाकरेंनी स्वत: निवडणुकांमध्ये सहभागी होत पराभवानं खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणली. मात्र आता परिस्थिती बदललीय. यंदा ठाकरेंना मोठी मेहनत करावी लागणारेय. कारण अनेक आव्हानांवर मात करत त्यांची ठाकरे ब्रँण्डसाठी लढाई आहे.

ठाकरे बंधुंसमोर काय आव्हानं?

जागावाटपानंतर बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान

भाजपसारखा बलाढ्य पक्ष आणि भली मोठी यंत्रणा

काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार संघांमध्ये विजयासाठी मेहनत

मराठी मतं टिकवण्यासाठी शिंदेगटासोबतची थेट लढत

सपा, MIM आणि वंचितसारख्या पक्षांची व्होट बँक

परप्रांतिय मतदारसंघांमध्ये मतं वळवण्याचं मोठं आव्हान

केवळ २० दिवसांमध्ये या सर्व आव्हानांना तोंड देण्याची रणनीती ठाकरे बंधूंना ठरवायची आहे. आणि ही सर्व जबाबदारी नव्या ठाकरेंकडे म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरेंवर सोपवण्यात आलीय. आता ही नवी पीढी गेल्या तीन दशकांची अबाधीत सत्ता राखण्यासाठी काय रणनीती आखणार आणि त्यात किती यशस्वी होणार ? याचीच आता चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT