राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आलेत.
सिद्धार्थ कांबळे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
सिद्धार्थ कांबळे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष होते.
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांवरून निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पक्ष अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नाराज झालेल्या सिद्धार्थ कांबळे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड केलीय. नवनियुक्त मुंबई विभागीय अध्यक्ष झिया सिद्दिकी यांच्या नियुक्तीनंतर पक्षात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा होती. त्यानंतर सिद्धार्थ कांबळे यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांवरील झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल करत झिशान सिद्दिकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पार्थ पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची वर्णी लागली. मात्र त्यामुळे नाराज झालेले पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी राजीनामा दिला. फेसबुक पोस्ट करत त्यांनी ही राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं.
परंतु पक्षात चुकीचा संदेश जावू नये. नाराजी वाढू नये यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेत कांबळे यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड केलीय. कांबळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आलंय. स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा, जनसेवेची परंपरा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी पुढे नेण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 'प्रदेश उपाध्यक्ष' पदी नियुक्त करण्यात येत आहे. आपल्या सहभागाने व परिश्रमाने संघटना अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, असा आम्हाला दृढ विश्वास आहे, असं नियुक्ती पत्रात म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.