Sanjay Raut On Akshay Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Akshay Shinde Encounter: ...म्हणून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला असावा, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Akshay Shinde: 'शौचालय साफ करणारा अक्षय शिंदे गोळ्या कसं झाडू शकतो. कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं आहे.' असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Priya More

बदलापुरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधात महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि राज्य सरकारवर टीका केली. 'शंका घ्यावा असाच प्रकार आहे. शौचालय साफ करणारा मुलगा गोळ्या कसं झाडतो. कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं आहे.' असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'शंका घ्यावा असाच प्रकार आहे. एखादा अपवाद वगळता एन्काऊंटर खरा नसतो. ही घटना घडली तेव्हा बदलापूरमधील जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या हातात द्या ही मागणी तेव्हा जनतेची होती. तेव्हा गृहमंत्र्यांनी असं करता येणार नाही म्हणून सांगितले. ज्याचा एन्काऊंटर झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे. एन्काऊंटर खरं आहे का नाही हे जनतेला माहिती आहे. जनतेवर दाखल केलेले गुन्हे देखील मागे घ्या.'

संजय राऊत यांनी या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. 'आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे. हातात बेड्या आहेत मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसं झाडतो. शौचालय साफ करणारा मुलगा गोळ्या कसं घालतो. कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं आहे. संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केले? बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती. राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यामुळे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी ही घटना झाली अशी चर्चा आहे.'

तसंच, 'राज्यात आणि देशात असे अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहेत. मला जितका अंडरवर्ल्ड माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला. आरोपीने आपल्या जबाबात काही खुलासे केले होते म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला आणि आता जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर करेल. सरन्यायाधीश यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चहा घेतला. मग कुणाकडून चौकशीची अपेक्षा ठेवायची?' असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT