Shivsena Leader Sitaram Dalvi passed away:  Saamtv
मुंबई/पुणे

Sitaram Dalvi Passed Away: शिवसेनेचा झुंझार शिलेदार हरपला! माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन

Shivsena Leader Sitaram Dalvi passed away: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍हयातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होत.

Gangappa Pujari

गणेश कवाडे, मुंबई

Sitaram Dalvi Passed Away: राजकीय वर्तुळातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार अशी ओळख असलेले माजी आमदार सिताराम दळवी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले, ते 82 वर्षांचे होते. सिताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

अंधेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सिताराम दळवी यांचे आज दुर्दैवी निधन झाले. सिताराम दळवी हे अधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्‍या तिकिटावर ते विजयी झाले होते. त्‍यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून ही विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कामकेलेल्या निष्‍ठावान शिवसैनिका पैकी ते एक होते.

शिवेसेनेच्‍या उभारतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍हयातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार , सुना नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता अंधेरीतील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

Politics : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महिला नेत्याला घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

Wedding Mandap Importance: लग्नात घराबाहेर अंगणात मंडप का बांधतात? यामागचं शास्त्र काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT