Eknath Shinde vs Uddhav Thackeray Maharashtra Politics Marathi News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार; भाजपकडून तयारी पूर्ण, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

Maharashtra Poltical News: ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार, भाजपकडून तयारी सुरू आहे. असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Poltical News: गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा राष्ट्रवादीतून बंडखोरी करत युती सरकारला पाठिंबा दिला. दरम्यान, अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री होताच शिंदे गटात नाराजी पसरल्याची चर्चा आहे.

शिंदे गटातील (Eknath Shinde Group) बहुतांश आमदार या निर्णयावर नाराज असल्याचं बोललं जातंय. अशातच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार, भाजपकडून तयारी सुरू आहे. असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

खासदार विनायक राऊत रविवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आगामी कोणत्याही निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकणार म्हणजे जिंकणारच आहे. ते कितीही एकत्र आले, कितीही गळाभेटी घेतल्या, तरीही महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार असल्यामुळे महाविकास आघाडीचाच विजय होईल, असं विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, विनायक राऊत यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील मोठं भाष्य केलं. “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आपण मागच्या अनेक महिन्यांपासून बोलत आहोत. त्यांची (शिंदे गट) कितीही पोपटपंची सुरू असली तरी मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. भाजपा त्यांना मंत्रीमंडळ विस्तार करू देणार नाही, असं विनायक राऊत म्हणाले.

त्याचबरोबर भाजपाकडून एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्या गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली आहे, असं विधान देखील विनायक राऊत यांनी केलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. पण आम्ही त्यांच्यासाठी अजून दरवाजे उघडलेले नाहीत. ते गद्दारी करून तिकडे गेलेत, त्यांची गद्दारी त्यांना लखलाभ होऊ द्या, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT