Sanjay Raut vs Ravi Rana Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : लाडकी पत्नी पराभूत झाल्याने राणा महाशयांचा तोल सुटलाय; ठाकरे गटाकडून रवी राणांना चिमटे, VIDEO

Sanjay Raut vs Ravi Rana : अमरावती लोकसभा निवडणुकीत रवी भाऊची लाडकी पत्नी नवनीत राणा यांचा दारुण पराभव झाल्यामुळे महाशयांचा तोल सुटलाय, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

Satish Daud

आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतदान न केल्यास लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाने चांगलाच समाचार घेतला आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत रवी भाऊची लाडकी पत्नी नवनीत राणा यांचा दारुण पराभव झाल्यामुळे महाशयांचा तोल सुटलाय, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

रवी राणा (Ravi Rana) यांच्यासारखे सरकारी लोचट मजनू लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे काढून घेण्याची भाषा करतात हा समस्त लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा पैसा यांच्या बापजाद्यांचा आहे काय किंवा सरकारी लुटीतला आहे काय? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

राणांपाठोपाठ मिंधे गटाचे एक आमदार महेश शिंदे यांनीही असेच फूत्कार सोडले आहेत. "विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केले तर ‘लाडकी बहीण’ योजनेतून नाव वगळून टाकू", अशी धमकी या महाशयांनी दिली आहे. वास्तविक पैसा सरकारचा, योजना सरकारची आहे, अशी आठवण सामना अग्रलेखातून करून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारचा दारुण पराभव झाला. त्यामुळे पैशांचा वापर करून मते विकत घेण्यासाठी राज्य सरकारने आता ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला.

तुम्ही कितीही काही करा, पण विधानसभेत तुमचा पराभव होईल. लाडक्या बहिणीच तुमचा पराभव करतील. 1500 रुपयांत मुख्यमंत्री व त्यांच्या टोळय़ांनी घरची चूल पेटवून दाखवावी, असं चॅलेंज सामनाच्या अग्रलेखातून महायुतीला देण्यात आलं आहे.

राज्यातील भगिनींनी सध्या हे 1500 रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच या मध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा. सरकारची खरी ‘नियत’च त्यामुळे चव्हाटय़ावर आली आहे. राज्यातील समस्त भगिनी या अपमानाचा योग्य बदला योग्य वेळी घेतील, याविषयी आमच्या तरी मनात शंका नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT