Shrikant Shinde Criticized Maha Vikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: घरातून बाहेर न निघणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

Shrikant Shinde Criticized Maha Vikas Aghadi: कल्याणमधील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

'लाडक्या बहिणी महायुतीसोबत आहेत. म्हणून घाबरून एका बाजूला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला तीन हजार रुपये देऊन असं खोटं बोलायचं . घरातून बाहेर न निघणाऱ्या आणि तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार? आम्ही जी कमिटमेंट करतो ती पूर्ण करण्याची ताकद महायुती सरकार ठेवतं.' असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. यापुढे बोलताना नागरिकांनी अशी फसवेगिरी करणाऱ्या सावत्र भावापासून सावध राहा असं देखील आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

कल्याणमध्ये महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाषण करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

श्रीकांत शिंदे यांनी 'महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करू, आमदार सुनील केदार लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी करत न्यायालयात याचिका टाकली, पंधराशे रुपयांत काय होणार, कुणाचं घर चालतं का? असे महाविकास आघाडीचे नेते बोलले. मात्र जे कधी स्वतःच्या घरातून बाहेर निघाले नाहीत त्यांना दुसऱ्यांचे घर कसं चालतं ते कळणार नाही?', असा टोला लगावला आहे.

तसंच, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांना गरिबी कळणार नाही. गरीब लोकांना आधार देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. लाडक्या बहिणी महायुतीच्या सोबत आहेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला महाविकास आघाडीचे नेते आणि उमेदवार नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे ठरेल. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र ते दिल्ली काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

Maharashtra News Live Update: प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

Petrol Price : पेट्रोल - डिझेल २२ रुपयांनी स्वस्त; इंधन टंचाईच्या काळात भारताचा शेजारी देश पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISI चे ९ संशयित दहशतवादी ताब्यात

Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT