Sanjay Raut - Raj Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हरची बघू, ओरिजिनल; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut - Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गट अध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री करत टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी थेट नाव न घेता उत्तर दिलं आहे. राजकारण ही मिमिक्री नाही. आम्हाला ओरिजिनल मिमिक्री बघायची असेल तर ती आम्ही जॉनी लिव्हरची बघू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, रविवारी गट अध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. या टीकेला आज, सोमवारी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'राजकारण ही मिमिक्री नाही. मिमिक्री बघायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची बघू, ती पण ओरिजिनल. आम्हाला राजू श्रीवास्तवही आवडायचा. इतरही अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री बघू. आवाज काढणे, अमूक-तमूक करणे खूप झाले. त्याही पलीकडे तुम्ही मॅच्युअर्ड झाला आहात. थोडं पलीकडे पाहा. महाराष्ट्र बघावा,' असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला.  (Latest Marathi News)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचे राजकारण किती काळ चालणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मी एका पक्षाचं नाव घेत नाही. त्यापेक्षा काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जशी आम्ही करतो आहोत. आमच्या पक्षावर इतकी संकटे आली आहेत. तरीही आम्ही कामे करतोय. लढतोय, असंही राऊत म्हणाले.

ज्यांनी आमच्यावर टीका केली, करताहेत, त्यांनी बुलडाण्याची सभा बघायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला हवे होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अख्खा बुलडाणा रस्त्यावर उतरला होता हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जी मेहनत आणि कष्ट घेतले, ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत, असेही राऊत म्हणाले.

संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे काय आहेत?

Maharashtra Live News Update: येरवडा कारागृहातील कैद्यांकडे सापडला मोबाईल,सिमकार्ड,पॉवर बँक,चार्जर आणि वायर

पुण्यातील बिल्डरकडून फसवणूक; सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं

Shrikant Shinde: लोकसभेत खास 'फ्रेंडशिप ग्रुप', श्रीकांत शिंदेंची तरुण सदस्य म्हणून एन्ट्री, नेमकं मिशन काय असणार?

Spruha Joshi: रुपसुंदरा, हिरव्या साडीत खुललं स्पृहा सौंदर्य, फोटो पाहून वेडे व्हाल

SCROLL FOR NEXT