Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अनिल परब, श्रद्धा जाधवसह ४८ शिवसैनिकांना दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Maharashtra Political News: २००५ साली नारायण राणे यांच्या सभेचे प्रभादेवीत आयोजन करण्यात आले होते. ही सभा शिवसैनिकांनी उधळवून लावल्याचा आरोप करण्यात आला होता.

Priya More

भाजप नेते नारायण राणे यांची सभा उधळवल्या प्रकरणामध्ये ४८ शिवसैनिकांना दिलासा मिळाला आहे. २००५ मध्ये शिवसेना सोडलेल्या नारायण राणे यांची सभा उधळल्या प्रकरणी या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामध्ये शिवसेना नेते अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नांदगावकर, बाळा नर यांच्यासह ४८ शिवसैनिकांचा समावेशी आहे. या सर्वांची सबळ पुराव्यांअभावी शनिवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२००५ साली शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीत नारायण राणेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक'सामना'च्या कार्यालयासमोरच ही सभा होणार होती. पण सभेदरम्यान शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून सभा उधळवून लावल्याचा आरोप करण्यात आला होता.

याप्रकरणी शिवसैनिकांविरोधामध्ये दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसैनिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले होते. याप्रकरणी शिवसैनिकांविरोधात ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेच्या १९ वर्षांनंतर याप्रकरणावर शनिवारी निकाल आला. न्यायालयाने गु्न्हा दाखल झालेल्या ४८ शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली. मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

अनिल परब, श्रद्धा जाधव, बाळा नर, बाळा नांदगावकर, सदा सरवणकर, रवींद्र चव्हाण, जितेंद्र जानवळे, राजेंद्र सूर्यवंशी, ज्योती भोसले, सुप्रिया नार्वेकर, स्वाती शिंदे, स्नेहल जाधव, मुकुंद पडयाळ, अजित कदम, संजय कदम, लता रहाटे, राजीव कोरी, विजय लोके, आत्माराम शिंदे, सदानंद परब, लक्ष्मण भोसले, राजू पेडणेकर, सुमित्रा पत्रे, नारायण काशीराम राणे, सुधा मेहेर, श्रीधर सावंत, हरिश्चंद्र कदम, सुनंदा सरकारे, श्रीधर शेलार, गोपीचंद भिलारे, सुगंधा शेटये, संजय भावके, रागिणी मांजरेकर, भावेश मथुरिया, सुभाष जाधव, वत्सला जाधव, हरिश्चंद्र सोलकर, अनिल राणे, वनिता इन्सुलकर, यशवंत जाधव, चंद्रपालचत्रु चंडेलिया, विक्की दुर्गावाले, जयश्री मतवंडकर, अनुसया महपती, रजनी मिस्त्री, सरिता इंगळे, धनंजय कांबळे, दीपक मोरे या सर्व शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT